महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यूपीएच्या काळातील राफेल करारापेक्षा आताचा करार स्वस्त - कॅग अहवाल

अहवालात राफेल लढाऊ विमान खरेदीत आधीच्या कराराच्या तुलनेत देशाचा १७.०८ टक्के पैसा वाचल्याचे समोर आले आहे. अहवाल सादर होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेसमोर निदर्शने केली होती. त्यांनी कागदाची राफेल विमाने तयार करून हवेत उडवली होती.

By

Published : Feb 13, 2019, 1:21 PM IST

Updated : Feb 13, 2019, 2:22 PM IST

नवी दिल्ली - कॅगचा अहवाल आज राज्यसभेत सादर झाला. अहवालात राफेल लढाऊ विमान खरेदीत आधीच्या कराराच्या तुलनेत देशाचा १७.०८ टक्के पैसा वाचल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या १२६ राफेल खरेदी करण्याच्या तुलनेत काही विशिष्ट सुधारणांसह ३६ राफेल खरेदी करण्याचा व्यवहारात देशाचा १७.०८ टक्के पैसा वाचल्याचे अहवालात म्हटले आहे.

राफेल खरेदी करण्यासाठी केलेल्या नवीन कराराने आर्थिक फायदा तर झाला आहेच. शिवाय, १२६ विमाने खरेदी करण्याच्या व्यवहारात १ विमान ५ महिन्यांनी भारतात येणार होते. त्याऐवजी १८ विमाने येणार आहेत, हाही फायदा झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे. अहवाल सादर होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेसमोर निदर्शने केली होती. त्यांनी कागदाची राफेल विमाने तयार करून हवेत उडवली होती.

Last Updated : Feb 13, 2019, 2:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details