पाटणा - बिहार येथे महाआघाडीने जागावाटप केल्यानंतर आज एनडीएतील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाआघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांवर डाव लावलेला दिसतो. केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद ते केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे नाव या यादीत आहेत.
लोकसभा निवडणुकांना २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना उधाण आले आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली महाआघाडीच्या जागा वाटपाचा तिढा काल सुटला. त्यानंतर भाजपसह एनडीए पक्षांनी आपले पत्ते उघड केले आहेत.
बिहार भाजप प्रमुख भूपेंद्र यादव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांना पाटणा साहिब येथून उमेदावरी जाहीर केली आहे. यापूर्वी येथून भाजपमधील बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी निवडणूक लढवली होती. रविशंकर प्रसादला उमेदवारी दिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट झाल्याचे आता सरळ संकेत मिळाले आहेत.
या बरोबरच एनडीएने दिग्गज नेते रिंगणात उतरवले आहे. त्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंहाचाही समावेश आहे. राधामोहन सिंह पूर्व चंपारण येथून निवडणूक लढवतील तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे बक्सार येथून निवडणूक लढवतील.
याव्यतिरिक्त नवादा येथील आमदार गिरीराज सिंह यांचे मतदार संघ बदलून बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्यासमोर भाकपचे कन्हैया कुमार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीकडून सध्या उमेदवारी जाहीर झालेली नाही. रामपाल यादव पाटलीपुत्र, आर. के. सिंह यांना आरा, राजिव प्रताप रूडी यांना सरण येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे चंदन कुमार हे नवादा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर, चिराग पासवान यांना जामुई येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने उतरवलेल्या उमेदवारांमुळे आगामी निवडणुकीत काट्याची टक्कर पाहण्यास मिळणार आहे.
-
भाजपच्या १७ उमेदवारांचे नाव -
बक्सर - अश्विनी चौबे
आरा - आर. के. सिंह
सासाराम - छेदी पासवान
पाटणा साहिब - रविशंकर प्रसाद
पाटलिपुत्र - रामकृपाल यादव
मुजफ्फरपूर - अजय निषाद
शिवहर - रमा देवी
पूर्व चंपारण - राधा मोहन सिंह
पश्चिम चंपारण - संजय जैस्वाल
सारण - राजीव प्रताप रुडी
महाराजगंज - जनार्दन सिंह सिग्रीवाल
दरभंगा - गोपालजी ठाकूर
उजियारपूर - नित्यानंद रॉय
औरंगाबाद - सुशील सिंह
मधुबनी - अशोक यादव
अररिया - प्रदीप कुमार सिंह
बेगुसराय - गिरिराज सिंह
-
जनता दल युनाईटेडच्या उमेदवारांचे नाव -
काराकाट - महाबलि सिंह
गया - विजय मांझी
जहानाबाद - चंद्रेश्वर चंद्रवंशी
नालंदा - कौशलेंद्र
मुंगेर - ललन सिंह
सिवान - कविता सिंह
गोपालगंज - डॉ. आलोक कुमार सुमन
वाल्मिकी नगर - बैधनाथ महतो
किशनगंज - महमूद असरफ
कटिहार - दुलाल चंद्र गोस्वामी
मधेपुरा - दिनेश चंद्र यादव
सुपौल - दिलेश्वर कामत
झंझारपुर - रामप्रीत मंडल
सीतामढी - डॉ. वरुण कुमार
पुर्णिया - संतोष कुशवाहा
भागलपूर - अजय कुमार मंडल
बांका - गिरधारी यादव
-
लोजपा चे उमेदवार -
हाजीपूर - पशुपती पारस
वैशाली - वीणा देवी
समस्तीपूर - रामचंद्र पासवान
जमुई - चिराग पासवान
नवादा - चंदन कुमार
खडगीया - या जागेवर नंतर उमेदवार जाहीर करण्यात येईल