महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Video : 'या कपड्यांविषयीच तर मोदी बोलत नाहीत ना?' - bihar police attack on car

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पोलीसच कारची तोडफोड करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

बिहार पोलीस
बिहार पोलीस

By

Published : Dec 22, 2019, 10:49 PM IST

Updated : Dec 22, 2019, 11:58 PM IST

मुंबई- 'सीएए' कायदा आणि 'एनआरसी'वरून देशात तणावाचे वातावरण कायम आहे. देशभरात आंदोलने सुरू असून आज पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील सभेत लोकांची माथी भडकावण्यावरून विरोधकांवर टीका केली. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पोलीसच कारची तोडफोड करत असलेले व्हिडिओ शेअर केले आहेत.

नवाब मलिक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोलीसच कार, दुचाकीची त्यांच्याकडील काठीने व रस्त्यावर पडलेल्या दगडांच्या साहाय्याने तोडफोड करत असल्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

दरम्यान, देशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोलण्याकडे लोक लक्ष देत नसल्याने ते जाळपोळ करत आहेत. मात्र, आग लावणाऱ्यांची ओळख त्यांच्या कपड्यावरूनच होते.

Last Updated : Dec 22, 2019, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details