१.१५ PM : पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील बैठक पूर्ण. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये ४५ मिनिटे ही चर्चा सुरू होती.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच, पवार यांची पुढची चाल काय असेल याबाबत त्यांचे मित्रपक्षही खात्री देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दुपारी १२ वाजता संसदेमध्ये या दोघांची बैठक होणार आहे. ही राजकीय बैठक नसून, यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधानांना सांगून, त्यांच्यासाठी मदतनिधी देण्याबाबत पवार मोदींशी चर्चा करतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.