पटना- गया येथे एका नक्षल महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात होत असलेल्या निषेध मोर्चात सहभागी होती. तिला मोर्चामधून पोलिसांनी अटक केल्याचे गयाचे शहर पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव कलावती असे आहे.
बिहार: गया येथे सीएएविरोधी मोर्चा, नक्षलवादी महिलेला अटक - naxalite arrest in gaya
कलावती ही बऱ्याच प्रकरणांमध्ये दोषी असल्याने तिला अटक करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक कुमार यांनी सांगितले आहे.
विरोध करण्याच्या बहाण्याने लोकांना एकत्रित करण्याची नक्षलवाद्यांची योजना आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली होती. विरोध प्रदर्शनाच्या नावावर नक्षलवादी चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. अटक केलेली आरोपी कलावती ही बऱ्याच प्रकरणांमध्ये दोषी असल्याने तिला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर, कलावतीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा-कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांनी केला भारतीय 'उसेन बोल्ट'चा सत्कार