महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माओवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 17 जवान हुतात्मा - छत्तीसगडमधील सुकमा येथे माओवादी हल्ला

छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 17 जवान हुतात्मा झाले आहेत.

NAXAL-ATTACK-IN-SUKMA-DISTRICT-OF-CHATTISGARH
NAXAL-ATTACK-IN-SUKMA-DISTRICT-OF-CHATTISGARH

By

Published : Mar 22, 2020, 4:08 PM IST

सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. गोळीबारानंतर 17 जवान बेपत्ता झाले होते. रविवारी पहाटेपासून ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये 17 जवानांचे मृतदेह आढळले आहेत.

माओवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 17 जवान हुतात्मा, जखमींना केले रुग्णालयात दाखल

शनिवारी चिंतागुफा येथील मीनपा जंगलामध्ये 250 ते 300 जवान सुरक्षा दलांनी माओवादीविरोधी मोहीम हाती घेतली होती. दिवसभर मोहीम राबवल्यानंतर वेगवेगळ्या तुकड्यांच्या मार्फत जवान आपल्या कॅम्पकडे परतत होते. त्यावेळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले आहेत. तर 14 जखमी जवानांना रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details