तिरुवनंतपूरम - केरळच्या कोचीमध्ये नियमित सरावादरम्यान ग्लायडर विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. सकाळी 7 वाजताथोप्पुमडी पुलाजवळ झालेल्या या अपघातामध्ये दोन अधिकारी गंभीर जखमी झाले होते. त्यांचा आयएएचएसएस संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नौदलाच्या दक्षिण कमांडने चौकशीचे आदेश दिले आहेत.
केरळमध्ये नौदलाच्या ग्लायडरचा अपघात; 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू - लेफ्टनंट राजीव झा
केरळच्या कोचीमध्ये नियमित सरावादरम्यान ग्लायडर विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये लेफ्टनंट राजीव झा (वय ३९, उत्तराखंड) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (वय २९, बिहार) यांचा मृत्यू झाला.
केरळ
नियमित सरावासाठी 'आयएनएस गरुड'वरून ग्लायडरने झेप घेतली होती. लेफ्टनंट राजीव झा (वय ३९, उत्तराखंड) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (वय २९, बिहार) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.