महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिद्धूंच्या पत्नीने दिला काँग्रेसचा राजीनामा - navjot singh sidhu wife leaves congress

काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्या अकाली दल-भाजप युती सरकारमध्ये आरोग्य मंत्री होत्या. त्या अमृतसर पूर्वमधून आमदार होत्या. त्यांनी काँग्रेसकडून आधी अमृतसर येथून आणि नंतर चंदीगडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना ही संधी न मिळाल्याने त्या नाराज होत्या.

सिद्धूंच्या पत्नीने दिला काँग्रेसचा राजीनामा

By

Published : Oct 23, 2019, 12:31 PM IST

चंदीगड -काँग्रेसच्या आमदार नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या पंजाब कॅबिनेटमध्ये मंत्रीही होत्या. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. कौर मंगळवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेरका येथे पोहोचल्या. तेथेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली.

काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्या भाजप-अकाली दलाच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होत्या. त्या अमृतसर पूर्वमधून आमदार होत्या. त्यांनी काँग्रेसकडून आधी अमृतसर येथून आणि नंतर चंदीगडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना ही संधी न मिळाल्याने त्या नाराज होत्या.

माझा आता कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आता फक्त मी एक समाजसेवक म्हणून कार्य करेन. जुलै महिन्यात नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या समर्थकांची भेट घेतली व काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांना सांगितले होते.

सिद्धू यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थक नगरसेवकांची भेट घेतली होती. पंजाब सरकारमधून राजीनामा देत असलो, तरी पक्षाचा राजीनामा देणार नाही असे सिद्धू म्हणाले होते. सिद्धू यांनी कार्यकर्त्यांना पक्षासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, असे त्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या नगरसेविका मोनिका शर्मा यांनी सांगितले होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details