महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नवज्योत सिंग सिद्धूंनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवला राजीनामा - resignation

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासोबत कोणत्याही समस्या नसल्याचे सांगितले. तसेच, सिद्धू यांच्या पत्नीला विरोध केला नव्हता, असेही ते म्हणाले.

नवज्योत सिंग सिद्धू

By

Published : Jul 15, 2019, 3:13 PM IST

चंदीगड - 'आज मी माझा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे,' असे पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धूंनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बऱ्याच काळापासून चाललेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

सिद्धू यांनी स्वतःच्या ट्विटरवरून १० जूनला दिलेले एका ओळीचे राजीनाम्याचे पत्र शेअर केले होते. सिद्धू यांचे खाते नुकतेच बदलण्यात आले होते. त्यांच्याकडे ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार एका महिन्यापूर्वीच सोपवण्यात आला होता. मात्र, सिद्धू यांचे खाते बदलण्यात आल्यानंतर त्यांची पदावरून अवनती झाल्याची भावना झाल्याने त्यांनी तो पदभार अद्याप स्वीकारला नव्हता. त्यांनी काही दिवसांपूर्वी तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, फारसा उपयोग झाला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासोबत कोणत्याही समस्या नसल्याचे सांगितले. 'खरे तर मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर मी सिद्धू यांच्याकडे चांगले आणि महत्त्वाचे खाते सोपवले होते. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. माझ्या कार्यालयात राजीनाम्याचे पत्र पोहोचवल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी ते पाहून नंतर काय करता येईल, याचा विचार करेन,' असे ते म्हणाले.

'सिद्धू यांच्या पत्नीला विरोध केला नव्हता. खरे तर, त्यांना भटिंडा येथून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, अशी शिफारस मी राहुल गांधींकडे केली होती. उलट, सिद्धूंनीच त्यांची पत्नी भटिंडा येथून लढणार नसून चंदीगडमधून लढणार असल्याचे सांगितले. मात्र, या बाबी त्यांनी ठरवायच्या नसून पक्षाने ठरवायच्या आहेत,' असे मुख्यमंत्री सिंग यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details