महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशाला काळ्या इंग्रजांपासून मुक्त करा - सिद्धू - भाजप

काँग्रेसने देशाला ५ गांधी दिले. मात्र, भाजपने देशाला फक्त भगोडे लोक दिलेले आहेत. पहिला नीरव मोदी, दुसरा ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी, असे सिद्धू म्हणाले.

काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू

By

Published : May 11, 2019, 8:28 AM IST

नवी दिल्ली- काँग्रेस पक्ष मौलाना आझाद आणि महात्मा गांधींचा आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली. ते इंदूर येथे बोलत होते.

काँग्रेसने देशाला ५ गांधी दिले. मात्र, भाजपने देशाला फक्त भगोडे लोक दिलेले आहेत. पहिला नीरव मोदी, दुसरा ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी, असे सिद्धू म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर खोटारडेपणाचे आरोप वाढतच चालले आहे. त्यांनी फक्त आणि फक्त अंबानींसाठी काम केले आहे. आज त्याचा फायदा चीनला होत आहे. मोदी म्हणतात मी चौकीदार आहे. मात्र, चौकीदार तर अंबानींच्या दारासमोर उभा राहतो. गरिबांच्या नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details