महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

७२ वर्षीय नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री, शपथविधीला बहीण गीता मेहताही होत्या उपस्थित - bjd

७२ वर्षीय पटनाईक बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि मोठ्या काळासाठी सेवा बजावणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासह २० आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतील.

नवीन पटनाईक

By

Published : May 29, 2019, 1:22 PM IST

Updated : May 29, 2019, 1:37 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी त्यांना शपथ दिली. लाल यांनी त्यांना रविवारी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्यासह २० आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी पटनाईक यांना ११ कॅबिनेट मंत्री आणि ९ राज्यमंत्र्यांचे मंत्रीमंडळ तयार करावे, असे सुचवले आहे. शपथविधीवेळी पटनाईक यांच्या भगिनी लेखक गीता मेहता उपस्थित होत्या.

७२ वर्षीय पटनाईक बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि मोठ्या काळासाठी सेवा बजावणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. राणेंद्र प्रताप स्वैन, बिक्रम केशरी, अरुखा, नाबा किशोरी दास, प्रताप जेना, प्रफुल्ल कुमार मल्लिक, निरंजन पुजारी, सुदाम मारंडी, सुसंत सिंग, तुकुनी साहू, अरुण कुमार साहू आणि पद्मनाव बेहेरा हे कॅबिनेट मंत्री पदासाठी शपथ घेतील. अशोक चंद्र पांडा, समीर रंजन दाश, ज्योती प्रकाश पाणिग्रही, दिब्या शंकर मिश्रा, प्रेमनंद नायक, रघुनंदन दास, पद्मिनी दायन, तुषारक्रांती बेहेरा आणि जगन्नाथ सराका यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात येईल.

ओडिशात विधानसभेच्या १४७ जागांसाठी आणि लोकसभेच्या २१ जागांसाठी एकाच वेळी निवडणूक घेण्यात आली होती. पटानाईक यांनी त्यांच्या घरच्या तर्फ हिंजिली आणि बीजापूर या विधानसभेच्या जागांवर विजय मिळवला. या अनुक्रमे अस्का आणि बारगढ या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये येतात. बिजू जनता दलाने विधानसभेच्या ११२ आणि लोकसभेच्या १२ जागांवर विजय मिळवला. विधानभेच्या जागांपैकी भाजपने २३, काँग्रेसने ९ आणि अपक्ष व भाकप (एम) यांनी प्रत्येकी १ जागा मिळवली.

नवीन पटनाईक हे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचे पुत्र आहेत. त्यांनी १९९७ मध्ये जनता दलातून बाहेर पडल्यानंतर 'बिजू जनता दल' या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००० साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा पक्ष २००९ पर्यंत भाजपसह युतीत राहिला. सलग ५ वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम आता पटनाईक यांच्या नावावर जमा झाला आहे.

Last Updated : May 29, 2019, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details