नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात बेअर ग्रिल्ससोबत सहभाग घेतला आहे. याचा व्हिडिओ स्वत: बेअर ग्रिल्सने ट्वीटरवर शेअर केला आहे. यानंतर, सोशल मीडियावर #beargrylls ट्वीटरवर ट्रेडिंगमध्ये असून व्हिडिओला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. परंतु, काही नेटकऱ्यांनी ट्वीटरवर मोदी आणि बेअर ग्रिल्सच्या भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल केल्या आहेत.
१. एका युझरने मोदी आणि बेअरचा फोटो शेअर केला आहे. याखाली मजेशीर कॅप्शन लिहिले आहे.
२. मोदी आणि बेअर ग्रिल्स बसलेल्या होडीच्या मागे रिपोर्टर कसे येतात. याचा फोटो पोस्ट केला आहे. आणि मोदी म्हणत आहेत, पिछे देखो, पिछे देखो, अरे पिछे तो देखो.
३. एका लहान मुलीने वातावरण बदलाविषयी विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी दिलेल्या मजेशीर उत्तराचा व्हिडिओ शेअर केला आहे.
४. काही युझर्सनी अरविंद केजरीवाल मोदी आणि बेअर ग्रिल्स बसलेल्या होडीला ओढत आहेत, असा मजेशीर फोटो पोस्ट केला आहे.
५. काही युझर्सनी डिस्कव्हरी चॅनेलवर येणाऱ्या नेकेड अॅन्ड अफ्रेड या कार्यक्रमाचा फोटो पोस्ट करत प्रश्न विचारला आहे, की मोदी या कार्यक्रमाला कधी हजेरी लावणार.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा वन्यप्राण्यांबद्दल जागृती करण्याबरोबरच जंगलाची सुरक्षा करणे आहे. याद्वारे पर्यावरणात होत असलेल्या बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनापूर्वी १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता 'डिस्कवरी' या वाहिनीवरती जवळपास १८० देशांमध्ये प्रसारित होणार आहे. बेअर ग्रिल्सने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.