महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थसंकल्पावर सोशल मीडियावर उमटलेल्या भन्नाट प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्यात का? - भारत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. सोशल मीडियामध्ये अर्थसंकल्पावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By

Published : Jul 6, 2019, 6:15 PM IST

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर अनेक तज्ञांनी विविध क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या त्याचा कसा फायदा किंवा तोटा होईल याची चर्चा रंगवली होती. परंतु, सोशल मीडियावर अर्थसंकल्पावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या.

सीतारामन यांनी संसदेत पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पूर्णवेळ असणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. बजेटमध्ये सितारामन प्रत्येक क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी सांगितल्या. परंतु, सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर एकाने ट्विट करत लिहिले, की अर्धा अर्थसंकल्प सादर झाला आहे. परंतु, अजूनही नेटफ्लिक्स, प्राईम आणि हॉटस्टारसाठी कोणतेही अनुदान देण्यात आले नाही. हा तोच भारत आहे का जिथे आपण राहत आहोत? #budget2019.

काहींनी #nirmala sitharaman ट्रेंडखाली ट्विट करत लिहिले की, अब यहां से कहां जाये हम.

ट्विट१

एका युझरने प्रसिद्ध असलेल्या पारले-जी बिस्किटावरील लहान मुलींचे चित्रांचे मिश्रण करत फोटो पोस्ट करत लिहिले, की अर्थसंकल्प ऐकताना मध्यमवर्गीयांची स्थिती #budget2019.

ट्विट२

तर, एकाने तारे जमीन पर चित्रपटातील मुलाचा फोटो पोस्ट करताना लिहिले, की अर्थसंकल्पावर तज्ञांची मते ऐकून माझी अवस्था

ट्विट६

काहींनी गोलमाल चित्रपटातील प्रसिद्ध वसुली कॅरेक्टरचा फोटो पोस्ट करत लिहिले, की अर्थसंकल्प ऐकल्यानंतर लोकांची स्थिती, समझ नही आया, पर सुनकर अच्छा लगा.

ट्विट३

काहींनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातील डायलॉगचा वापर करत मध्यमवर्गीयांची अर्थसंकल्पाकडून असलेल्या इच्छा आणि अर्थसंकल्पाकडून झालेली निराशा यावर मजेशील फोटो ट्विट केला आहे.

ट्विट४

एका युझरने फिर हेरा फेरी चित्रपटातील अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांच्यातील संवादाचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये मध्यमवर्गीय आणि अर्थसंकल्प यांच्यावर मजेशील कमेंट करण्यात आल्या आहेत.

ट्विट ५

ABOUT THE AUTHOR

...view details