शिमला - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी लागली आहे. या काळात गरीब, रोजंदारी कामगार वर्ग, मजूर, स्थलांतरितांच्या जेवणाची मोठी परवड होत आहे. त्यांच्या सोयीसाठी विविध स्तरातून मदतीचा हात देण्यात येत आहे. यात तृतियपंथी असलेल्या ज्योती महंत यांनी 700 कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप केले आहे.
ज्योती हे पंजाबच्या हाजीपूर येथील मूळचे रहिवासी आहेत. त्यांनी हिमाचल प्रदेशातील ठाकूनवाडा या गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीला हे धान्य वाटप केले आहे.
ज्योती म्हणाले, हे लोक माझ्या कुटुंबासारखेच आहेत. त्यांच्या गरजेच्या वेळी मी त्यांना एकटे कसे सोडणार, यामुळे त्यांच्या अन्नाची व्यवस्था करत आहे.
ज्योती यांनी 700 मोठ्या पिशव्यातून अन्नधान्य व जीवनावश्यक साधन एका टेम्पोतून आणले होते. ज्योती पुढे म्हणाल्या, आम्ही तृतीयपंथी असल्याने समाजातील काही घटक आम्हाला कलंक मानतात. पण, आम्हीही माणसे आहोत. आमच्यातही माणुसकी आहे. त्यामुळे संकटाच्या काळात मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.
हेही वाचा -येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीत कोरोनाग्रस्त वाढण्याची शक्यता - केजरीवाल