नवी दिल्ली - 'भारत माता की जय' या घोषणेचा दुरुपयोग केला जात आहे. आजच्या काळात राष्ट्रवादाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. जवाहरलाल नेहरू यांच्यावरील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
'राष्ट्रवाद आणि 'भारत माता की जय' घोषणेचा उपयोग दिशाभूल करण्यासाठी केला जातोय' - भारत माता की जय
नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
कार्यक्रमात बोलताना सिंग यांनी नेहरू यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्यांचाही समाचार घेतला आहे. 'जवाहरलाल नेहरू एक इतिहासकार आणि साहित्यिकही होते. मात्र, इतिहास माहित नसणाऱ्या किंवा अर्धवट वाचलेल्या लोकांनी नेहरूंना चुकीच्या पद्धतीने मांडले. नेहरूंची प्रतिमा मलीन करण्याचा कुटील डाव रचला, अशी टीकाही यावेळी सिंग यांनी केली.