महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय युवा दिन : तरुण पिढीसाठी विवेकानंद खास का आहेत? - राष्ट्रीय युवा दिन २०२१

भारताची लोकसंख्या जगातील सर्वात तरुण आहे. २०२२ पर्यंत भारताचे सरासरी वय २८ वर्षे होईल, तर चीन व अमेरिकेत हे वय ३७, पश्चिम युरोपमध्ये ४५ आणि जपानमध्ये ४९ असे असेल. ऐतिहासिक अर्थव्यवस्थांच्या एकूणच आर्थिक वाढीमध्ये लोकसंख्याशास्त्रीय लाभांश १५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

national-youth-day-celebration 2021
राष्ट्रीय युवा दिन : तरुण पिढीसाठी विवेकानंद खास का आहेत?

By

Published : Jan 12, 2021, 6:10 PM IST

मुंबई - स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते आणि भारतातील हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवन करणाऱ्यांपैकी एक होते. या दिनानिमित्ताने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय २४वा राष्ट्रीय युवा महोत्सव (एनवायएफ) २०२१ आयोजित करेल.

विवेकानंदांनी वेदांत आणि योगाचे भारतीय तत्त्वज्ञान पाश्चिमात्य जगासमोर आणले. ते देशभक्त होते आणि भारतातील तत्त्वज्ञानाच्या योगदानासाठी नायक मानले गेले. त्यांनी भारतातील व्यापक दारिद्र्यकडेही लक्ष वेधले. देशाच्या विकासासाठी दारिद्र्याच्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते.

स्वामी विवेकानंद म्हणतात की, सर्व शक्ती तुमच्यात आहे, तुम्ही काहीही करु शकता. यावर विश्वास ठेवा, आपण अशक्त आहात यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही अर्धे वेडे आहात, असे समजू नका. आजकाल आपल्यापैकी बरेच जण असा विश्वास ठेवतात. आपण कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय सर्व काही करू शकता. उभे राहा आणि तुमची आंतरिक शक्ती व्यक्त करा.

स्वामी विवेकानंद (१८६३-१९०२)

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला होता. त्यांच्या बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. १ ८९३मध्ये शिकागो येथे जागतिक धर्मपरिषदेत बोलताना विवेकानंद यांनी वेदांत तत्त्वज्ञान पाश्चिमात्य देशांसमोर आणले आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. या धर्म संसदेत भाषण केल्यानंतर ते प्रसिद्ध झाले.

विवेकानंद हे १९व्या शतकातील रहस्यवादी रामकृष्ण परमहंसांचे प्रख्यात शिष्य होते, त्यांनी मातृभूमीच्या उत्कर्षासाठी शिक्षणावर सर्वाधिक भर दिला.

१८९७मध्ये विवेकानंद रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले. रामकृष्ण मिशन ही अशी संस्था आहे, जी मूल्य-आधारित शिक्षण, संस्कृती, आरोग्य, महिला सशक्तीकरण, युवा आणि आदिवासी कल्याण आणि मदत व पुनर्वसन या क्षेत्रात कार्य करते.

१९०२मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठात विवेकानंद यांचे निधन झाले. बेलूर हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे मुख्यालय आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांचा वाढदिवस १९८४मध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला. या दिवशी देशातील तरुणांनी विवेकानंदांची मूल्ये, तत्त्वे आणि श्रद्धा वाढवण्याची अपेक्षा आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत प्रसिद्ध होते. विवेकानंद यांचे देशातील तरूणांशी खास नाते होते आणि म्हणूनच शैक्षणिक सुधारणांच्या मुद्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. आम्हाला असे शिक्षण हवे आहे ज्याद्वारे चरित्र बांधले जाते, मनाची शक्ती वाढते आहे, बुद्धीचा विस्तार होतो. आणि त्या व्यक्तीला त्यांच्या स्वत: च्या पायावर उभे राहण्याची परवानगी देणे, असे विवेकानंद यांनी लिहिले आहे.

एक तरुण राष्ट्र म्हणून भारत

भारताची लोकसंख्या जगातील सर्वात तरुण आहे. २०२२ पर्यंत भारताचे सरासरी वय २८ वर्षे होईल, तर चीन व अमेरिकेत हे वय ३७, पश्चिम युरोपमध्ये ४५ आणि जपानमध्ये ४९ असे असेल. ऐतिहासिक अर्थव्यवस्थांच्या एकूणच आर्थिक वाढीमध्ये लोकसंख्याशास्त्रीय लाभांश १५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

तरुणांसाठी आव्हाने

जेव्हा या लोकसंख्याशास्त्रीय बदलांशी धोरणे आणि कार्यक्रम जोडले जातील तेव्हाच भारताला त्याच्या लोकसंख्येचा फायदा होईल. युनिसेफ २०१९च्या अहवालानुसार २०३०मध्ये रोजगार मिळवण्यासाठी ४७टक्के भारतीयांकडे योग्य शिक्षण आणि कौशल्य असणार नाही.

साथीच्या आजारानंतर तरुणांना बेरोजगारी, शिक्षणामधील अडथळे इत्यादी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

रोजगाराच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की आपल्यामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. १५ ते २९ टक्के असा हा दर आहे.

हेही वाचा - ICC Test Rankings : विराटचे दुसरे स्थानही गेले; अजिंक्य, अश्विनसह बुमराहला फटका

ABOUT THE AUTHOR

...view details