नवी दिल्ली -दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दंगलग्रस्त भागांची पाहणी केली. दिल्लीच्या सुरक्षेची सुत्रे आता अजित डोवाल यांच्या हाती देण्यात आली असून त्यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांची पाहणी केली तसेच सर्वसामान्यांशी संवाद साधला आहे. तसेच लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले.
अजित डोवालकडून दंगलग्रस्त भागांची पाहणी, लोकांशी केली चर्चा - अजित डोवाल यांनी दंगलग्रस्त भागांची पाहणी
ल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दंगलग्रस्त भागांची पाहणी केली.
अजित डोवाल यांनी मौजपूर, जाफराबाद, घोंडा, सिलमपूर, आणि नॉर्थ-ईस्ट दिल्ली या भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांसोबत संवाद साधला. मनामध्ये प्रेमाची भावना ठेवा. आपला एक देश आहे. सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहायला हवे. आपल्याला देशाला पुढे न्यायायचे आहे, असे डोवाल नागरिकांशी सवांद साधताना म्हणाले. पोलीस आपले कार्य करत आहे. परिस्थिती पूर्णपणे नियत्रंणामध्ये असून लोक शांत झाले आहेत. मला सुरक्षा यंत्रनावर पूर्णपणे विश्वास आहे, असे डोवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून दगंलग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
TAGGED:
#NortheastDelhi