महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लंच पे चर्चा: कलम 370 रद्द केल्यानंतर अजित डोवाल यांनी घेतली नागरिकांची भेट - शोपियान

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शोपियान येथील नागरिकांची भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी त्यांच्यासोबत जेवण देखील केले.

अजित डोवाल यांनी घेतली नागरिकांची भेट

By

Published : Aug 7, 2019, 8:11 PM IST

श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यापासून एकामागोमाग एक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शोपियान येथील नागरिकांची भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी त्यांच्यासोबत जेवण देखील केले.


अजित डोवाल यांनी जिल्ह्यातील सुरक्षादलाची देखील भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.


काश्मीरमधील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.त्यामध्ये काश्मीरमधील वातारण शांत असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांची रस्त्यांवर ये-जा सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.


राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थिती निवळल्यानंतर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल, असं अमित शहा यांनी सांगितले आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतरही त्यांची विधानसभा नसेल. जम्मू-काश्मीरही केंद्रशासित प्रदेश बनेल, मात्र जम्मू-काश्मीरची विधानसभा असेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details