कोईम्बतूर - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तमिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 5 ठिकाणी छापे टाकले आहेत. यावेळी लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम, कार आणि पेन ड्राईव्ह जप्त केली आहे. काही संशयास्पद कारवायांची माहिती मिळाल्यामुळे छापा मारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेचे कोईम्बतूरमध्ये 5 ठिकाणी छापे, लॅपटॉप-मोबाइल फोन जप्त - हाय अलर्ट
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 5 ठिकाणी छापे टाकले आहेत.
तमिळनाडूमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज पहाटे 5 च्या सुमारास एनआयएने उमर फारूक, सद्दाम हुसैन, सनोफर अली, समेशा मुबीन, आणि मोहम्मद यासीर यांच्या घरी छापे टाकले आहेत. एनआयए आणि कोईम्बतूर पोलिसांनी मिळून ही कारवाई केली आहे.
दहशतवादी सागरी रस्त्यामार्गे तमिळनाडूत शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व जिल्ह्यांच्या आणि किनारपट्टीच्या भागातील यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांना फेरी आणि बोटींच्या जाण्यायेण्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.