बागलकोटा- कर्नाटक राज्याला पुराचा फटका बसला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक लोक बेघर झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही लोकांचा स्वातंत्र्य दिनासाठीचा उत्साह कायम आहे. आज स्वातंत्र्यदिनी शूरपाली गावच्या नागरिकांनी भर पुरामध्ये भारतीय तिरंगा झेंडा फडकवला आहे.
कर्नाटकातील गावकऱ्यांनी भर पुरात फडकवला राष्ट्रध्वज
सर्व गाव पाण्याखाली गेले असले तरी लोकांनी गावात तीन ठिकाणी ध्वजारोहण केले आहे. पंचायत, सरकारी शाळा आणि गावातील युथ संघटन शाखेच्या परिसरात अतिशय आदरपूर्वक गावकऱ्यांनी ध्वजारोहण केले.
शूरपाली गावाला पुराचा फटका बसला आहे. सर्व गाव पाण्याखाली गेले असले तरी लोकांनी गावात तीन ठिकाणी ध्वजारोहण केले. पंचायत, सरकारी शाळा आणि गावातील युवा संघटन शाखेच्या परिसरात अतिशय आदरपूर्वक गावकऱ्यांनी ध्वजारोहण केले.
गावांतील लोकांनी झेंडा फडकवण्यासाठी एका होडीची मदत घेतली. संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असताना गावकऱ्यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. कर्नाटकमधील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील लोक पुराचा सामना करीत असून आतापर्यंत 61 लोकांनी आपला जीव गमावला आहे.