महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेल्या अर्जावर 2 ऑगस्टपर्यंत स्थगिती

मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात आरोपपत्रांचा भाग असलेल्या साक्षीदारांच्या विधानाची न छापलेली प्रत मिळविण्यासाठी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.

मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Jul 22, 2019, 2:24 PM IST

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात आरोपपत्रांचा भाग असलेल्या साक्षीदारांच्या विधानाची न छापलेली प्रत मिळविण्यासाठी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.


मुंबईतील विशेष न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणी आरोपपत्रांचा भाग असलेल्या साक्षीदारांच्या विधानाची न छापलेली प्रत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने २ अॉगस्ट पर्यंतची सुनावणी स्थगित केली आहे.

काय आहे प्रकरण -

मालेगावमधील एका मशिदीत २९ सप्टेंबर २००८ ला बॉम्बस्फोट झाला होता. यात ६ जण ठार तर १०० जण जखमी झाले होते. या प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ८ जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अजय एकनाथ राहिरकर यांना १३ जूनला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांना न्यायालयाने बॉम्बस्फोट संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे उत्तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details