नवी दिल्ली - जगातील काही भागांत सूर्य ग्रहणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे. सूर्य ग्रहणाच्यावेळी सूर्य पूर्णपणे गडद झाला होता. चिली, अर्जेंटिना आणि ब्राझिलच्या काही भागांमधून हे सूर्यग्रहण पाहायला मिळाले आहे. रात्र असल्यामुळे भारतामध्ये हे ग्रहण पाहायला नाही मिळाले.
चिली-अर्जेंटिनामध्ये असे दिसले सूर्यग्रहण...पाहा फोटो, - Argentina
जगातील काही भागांत सूर्य ग्रहणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे. सूर्य ग्रहणाच्यावेळी सूर्य पुर्णपणे गडद झाला होता. चिली, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या काही भागांमधून हे सूर्यग्रहण पाहायला मिळाले.
सूर्य ग्रहणाच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. नासाने या सूर्य ग्रहणाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत. याचबरोबर अंतरिक्ष विज्ञान संस्थेने या ग्रहणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले आहे. चिली, अर्जेंटिना आणि दक्षिण पॅसिफिक प्रदेशात 6000 मैलापर्यंत सूर्यग्रहण पाहायला मिळाले आहे. या सुंदर दृश्याची छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत.
सर्वप्रथम चिलीमध्ये 3 वाजून 21 मिनिटाला सूर्य ग्रहण पाहायला मिळाले. चिली, उरुग्वे, पराग्वे, इक्वाडोर आणि ब्राझीलमध्ये सुर्य ग्रहण पाहायला मिळाले. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशात रात्र असल्यामुळे सूर्यग्रहण पाहायला मिळाले नाही .