अमेठी - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी येथील प्रचारादरम्यान 'लोकांचे प्रश्न सोडवणे हाच राष्ट्रवाद' असल्याचे सांगत भाजपला टोला लगावला आहे. 'ते (भाजप) लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. लोक जेव्हा त्यांच्या समस्या सांगतात, तेव्हा त्यांना गप्प बसवले जाते. दडपशाही केली जाते. ही लोकशाहीही नाही आणि राष्ट्रवादही नाही,' असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
लोकांचे प्रश्न सोडवणे हाच राष्ट्रवाद, प्रियांका गांधींचा अमेठीत भाजपला टोला - problem
'लोकांचे प्रश्न सोडवणे हाच राष्ट्रवाद' असल्याचे सांगत भाजपला टोला लगावला आहे. 'ते (भाजप) लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. लोक जेव्हा त्यांच्या समस्या सांगतात, तेव्हा त्यांना गप्प बसवले जाते. दडपशाही केली जाते. ही लोकशाहीही नाही आणि राष्ट्रवादही नाही,' असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
प्रियांका गांधी
'रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या मुख्य समस्या आहेत. त्यामध्येच आम्ही काम करणार आहोत,' असे त्या म्हणाल्या. 'भाजप येथे मीडियासमोर लोकांना पैसे, साड्या, चपला वाटत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. अमेठीतील लोकांनी कधीही कोणाच्याही समोर भीक मागितली नाही. मी येथे वयाच्या १२ व्या वर्षापासून येत आहे. अमेठी आणि रायबरेतील लोक स्वाभिमानी आहेत,' असे म्हणत प्रियांका यांनी भाजपवर हल्ला चढवला.