महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2019, 8:20 AM IST

Updated : Dec 3, 2019, 8:30 AM IST

ETV Bharat / bharat

विक्रम लँडरचा शोध लागला; नासाच्या लुनार ऑर्बिटरने घेतली छायाचित्रे

विक्रम लँडरबाबत नासाने एक नवीन खुलासा केला आहे. नासाला विक्रम लँडरची काही छायाचित्रे मिळाली आहेत. ट्विट करून ही माहिती दिली.

विक्रम लँडरचा शोध
विक्रम लँडरचा शोध

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा(इस्त्रो) महत्त्वकांक्षी चंद्रयान 2 ही मोहिम विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने अडचणीत आली. या मोहिमेबाबत नासाने एक नवीन खुलासा केला आहे. नासाला विक्रम लँडरची काही छायाचित्रे मिळाली आहेत. ट्विट करून ही माहिती दिली.

हेही वाचा - भारतीय नौदलात रचला इतिहास, शिवांगी स्वरुप बनल्या पहिल्या महिला पायलट
नासाच्या 'लुनार रिकॉनिसेंस ऑर्बिटर'ने ही छायाचित्रे घेतली आहेत. यामध्ये विक्रम लँडरचे ज्या जागी हार्ड लँडिंग झाले त्या जागेची ही छायाचित्रे आहेत. लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाच्या ईशान्येला सुमारे 750 मीटर अंतरावर काही अवशेष आढळले आहेत. नासाने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये हिरवे ठिपके लँडरचे तुकडे दर्शवत असून निळे ठिपके हार्ड लँडिंगमुळे जमिनीला पडलेले खड्डे दर्शवत आहे. लँडरचे मोडतोड झालेले अवशेष दिसत आहेत. सात सप्टेंबरला विक्रम लँडरचा लँडिंगच्या काही मिनीटे अगोदर पृथ्वीशी संपर्क तुटला होता.

Last Updated : Dec 3, 2019, 8:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details