नवी दिल्ली- विक्रम लँडरचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) करत आहे. नासाच्या लुनार रिकॉन्सिनन्स(LOR) ऑर्बिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळच्या वेळी फोटो काढण्यात आल्यामुळे विक्रम लँडर दिसू शकले नाही, असे नासाने म्हटले आहे.
विक्रम लँडरा पुन्हा ऑक्टोबरमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नासाने सांगतले आहे. विक्रम लँडर दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी दूर पडले आहे. १७ सप्टेंबरला नासाचा लुनार आर्बिटर या भागातून गेला. त्यावेळी त्याने विक्रम लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नासाला अपयश आले.