नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेस मास्क ऐवजी रुमालाने तयार केलेला मास्क लावला आहे.
पंतप्रधान मोदींनी रुमालाचा मास्क म्हणून केला वापर... - WearFaceCoverStaySafe
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेस मास्क ऐवजी रुमालाने तयार केलेला मास्क लावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उत्तर प्रदेशातील लोकांना दिलेल्या सल्ल्याचे पालन करताना पाहायला मिळाले. ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांनी घरातील स्वच्छ कापडाचा मास्क म्हणून वापर करावा, असा सल्ला मोदींनी दिला होता. आपल्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी आज कोरोना विषाणूवरील आढावा बैठकीत रुमालचा मास्क म्हणून वापर केला. तसेच राज्यातील सर्व मुख्यमंत्रीही मास्क लावून या बैठकीला उपस्थित आहेत.
कोरोना संक्रमाणापासून बचाव करण्यासाठी तोंड झाकणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे कापड, रुमाल वापरता येतो. ज्याच्यांकडे मास्क नाही ते घरातील स्वच्छ कापडाचा मास्क म्हणून वापर करू शकतात.