महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मै नरेंद्र दामोदरदास मोदी...' नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ - मंत्रिमंडळात

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी बिस्मटेक देशांसह 8 देशांचे प्रतिनिधी, सिनेजगतातील सितारे, क्रीडाजगत आणि उद्योग विश्वातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी 24 जणांनी कॅबिनेट मंत्री तर, 33 जणांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदी शपथ घेताना

By

Published : May 30, 2019, 1:47 PM IST

Updated : May 30, 2019, 9:10 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. यावेळी, बिस्मटेकमधील देशांच्या प्रमुखांसह एकूण 8 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात एकून 24 कॅबिनेट तर, 33 केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

  • 8.49 - शपथविधी सोहळा संपन्न
  • पंतप्रधान मोदींसह 24 कॅबिनेट मंत्री आणि 33 जणांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ
  • 8.57 - देवश्री चौधरी यांनी घेतली शपथ, रायगंज (पश्चिम बंगाल) येथून खासदार, 18 व्या वर्षापासून राजकारणात, 100 पेक्षा अधिक चित्रपटात काम, 40 पेक्षा अधिक पुरस्कार
  • 8.55 - कैलाश चौधरी यांनी घेतली शपथ, बाडमेर (राजस्थान) येथूून खासदार, भाजपचे राजस्थानातील मोठे नेते
  • 8.53 - प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली शपथ, बालासोर (ओडिशा) येथून खासदार, गरीब खासदार म्हणून ओळख, सायकलवरुन करतात प्रवास
  • 8.51 - सोमेश्वर तेली यांनी घेतली शपथ, पहिल्यांदाच मिळाले मंत्रीपद, दिब्रुगड (आसाम) येथून खासदार
  • 8.49 - सोमप्रकाश यांनी घेतली शपथ
  • 8.47 - रेणुका सिंह यांनी घेतली शपथ, सरगुजा (छत्तीसगड) येथून खासदार, कोट्यधीश खासदार म्हणून ओळख,
  • 8.45 - व्ही मुरलीधरन यांनी घेतली शपथ
  • 8.43 - रतनलाल कटारिया यांनी घेतली शपथ, अंबाला मतदारसंघाचे खासदार, कविता, शायरी लिहिण्याचा छंद
  • 8.41 - नित्यानंद राय यांनी घेतली शपथ
  • 8.39 - सुरेश अंगडी यांनी घेतली शपथ, बेळगाव (कर्नाटक) येथून 4 वेळा खासदार, लिंगायत समाजाचे नेते म्हणून ओळख,
  • 8.37 - अनुराग ठाकूर यांनी घेतली शपथ
  • 8.35 - संजय धोत्रे यांनी घेतली शपथ, अकोला (महाराष्ट्र) येथून खासदार
  • 8.33 - संजीव कुमार बालियान यांनी घेतली शपथ
  • 8.31 - बाबुल सुप्रियो यांनी घेतली शपथ, आसनसोल (पश्चिम बंगाल) येथून खासदार
  • 8.29 - साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली शपथ, फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथून खासदार
  • 8.27 - रामदास आठवले यांनी घेतली शपथ, पंढरपूर येथून 1999 साली खासदार, आरपीआय पक्षाचे अध्यक्ष, सामाजिक न्यायमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात पाहिले आहे काम
  • 8.25 - पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतली शपथ
  • 8.23 - जी किशन रेड्डी यांनी घेतली शपथ, सिकंदराबाद (तेलंगाणा) येथून खासदार
  • 8.21 - रावसाहेब दानवे यांनी घेतली शपथ, जालना येथून सलग ५ वेळा खासदार, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष, सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास
  • 8.20 - कृष्णपाल गुज्जर यांनी घेतली शपथ, फरीदाबाद (हरियाणा) येथून खासदार, सलग दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी
  • 8.19 - व्ही. के सिंग यांनी घेतली शपथ, परराष्ट्र मंत्री म्हणून पाहिले आहे काम, सलग दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी
  • 8.17 - अर्जून मेघवाल यांनी घेतली शपथ, बीकानेर येथून खासदार, दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी, जल संसाधन आणि गंगा संधारण मंत्री म्हणून पाहिले आहे काम.
  • 8.15 - अश्निनीकुमार चौबे यांनी घेतली शपथ
  • 8.13 - फग्गन सिंह फुलस्ते यांनी घेतली शपथ
  • 8.11 - मनसुख मंडाविय यांनी घेतली शपथ, अभाविपचे सदस्य म्हणून काम, मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा वर्णी
  • 8.09 - हरजितसिंग पुरी यांनी घेतली शपथ
  • 8.06 - राज कुमार सिंग यांनी घेतली शपथ
  • 8.04 - प्रल्हाद पटेल यांनी घेतली शपथ, दमोह येथून पाचव्यांदा खासदार
  • 8.02 - किरण रिजीजू यांनी घेतली शपथ
  • 8.00 - जितेंद्र सिंह यांनी घेतली शपथ, उधमपूर येथून खासदार, भाजप कार्यकारणीचे सदस्य, जम्मू-काश्मीरमध्ये भाजप वाढीस मोठा हात.
  • 7.58 - श्रीपाद नाईक यांनी घेतली शपथ, गोव्यातून सलग 5 वेळा खासदार, मोदी मंत्रिमंडळात सलग दुसऱ्यांदा वर्णी
  • 7.57 - राव इंद्रजीत सिंह यांनी घेतली शपथ, गुडगाव येथून खासदार
  • 7.56 - संतोष गंगवार यांनी घेतली शपथ
  • केंद्रीय राज्यमंत्री शपथविधीला सुरुवात
  • 7.54 - गजेंद्र सिंह शेखावत, जोधपूरचे खासदार, दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात वर्णी
  • 7.52 - गिरीराज सिंह यांनी घेतली शपथ
  • 7.49 - शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ, दक्षिण मुंबई येथून खासदार, 30 वर्षे एमटीएनएल कामगार संघाचे अध्यक्ष.
  • 7.46 - महेंद्रनात पांडे यांनी घेतली शपथ
  • 7.45 - प्रल्हाद जोशी यांनी घेतली शपथ, धारवाड येथून खासदार
  • 7.43 - मुख्तार अब्बाद नक्वी यांनी घेतली शपथ, अमित शाह यांचे विश्वासू, मुस्लीम मते भाजपकडे वळवण्यात मोठा हात, अल्पसंख्यांक मंत्री म्हणून पाहिले आहे काम
  • 7.40 - धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली शपथ
  • 7.38 - पियुष गोयल यांनी घेतली शपथ, रेल्वेमंत्री म्हणून पाहिले आहे काम
  • 7.37 - प्रकाश जावडेकर यांनी घेतली शपथ, 2014 साली पर्यावरणमंत्री, 2016 साली मनुष्यबळ विकासमंत्री, भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळख
  • 7.36 - डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली शपथ
  • 7.34 - स्मृती इराणी यांनी घेतली शपथ
  • 7.32 - अर्जून मुंडा यांनी घेतली शपथ
  • 7.29 - रमेश पोखरियाल यांनी घेतली शपथ
  • 7.27 - एस. जयशंकर यांनी घेतली शपथ
  • 7.25 - थावरचंद गेहलोत यांनी घेतली शपथ
  • 7.24 - हरसिमरत कौर यांनी घेतली शपथ
  • 7.21 - रवीशंकर प्रसाद यांनी घेतली शपथ
  • 7.19 - नरेंद्र सिंग तोमर यांनी घेतली शपथ
  • 7.17 - रामविलास पासवान यांनी घेतली शपथ, मोदींचे विश्वासू म्हणून ओळख, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, दाजीपूर (बिहार) येथून खासदार. 2014 साली श्रम कल्याणमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात.
  • 7.15 - निर्मला सीतारमण यांनी घेतली शपथ, सप्टेंबर 2017 साली भारताच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त. माजी भाजप प्रवक्त्या.
  • 7.10 - डी व्ही सदानंद गौडा यांनी घेतली शपथ, उत्तर बंगळुरू येथून खासदार, कर्नाटकातील भाजपचे मोठे नेते म्हणून ओळख, 2014 साली रेल्वेमंत्री म्हणून घेतली होती शपथ
  • 7.09 - नितीन गडकरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, नागपूर येथून खासदार, 2014 साली रस्ते वाहतुक, जलस्त्रोत आणि गंगा संवर्धन मंत्री म्हणून नियुक्त, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष.
  • 7.07 - अमित शाहांनी घेतली मंत्रिपदाजी शपथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, गांधीनगर येथून खासदार
  • 7.06 - राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, लखनऊ मतदारसंघातून खासदार, वाजपेयींचे निष्ठावंत म्हणून ओळख. 2014 च्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री.
  • केंद्रीय कॅबिनेट मंत्री शपथविधीला सुरुवात
  • 7.05 - राष्ट्रपतींनी पदाची आणि गोपनियतेची नरेंद्र मोदींना दिली शपथ
  • 7.05 - मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नियुक्त
  • 7.00 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन
  • 6.55 - राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदींचे आगमन
  • 6.50 - नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनकडे रवाना
  • 6.44 - सुषमा स्वराज शपथ घेणार नाहीत.
  • 6.43 - सुषमा स्वराज पाहुण्यांच्या रांगेत.
  • 6.40 - सुषमा स्वराज यांचे राष्ट्रपती भवन येथे आगमन
  • 6.35 - राष्ट्रपती भवन येथे उद्धव ठाकरेंचे आगमन
  • 6.30 - राहुल गांधी आणि सोनिया गांधी शपथविधीला उपस्थित
  • 6.25 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शपथविधीला हजर.
  • 6.23 - जनता दलाची शपथविधीतून माघार, नितीश कुमारांचे स्पष्टीकरण.
  • 6.20 - माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे राष्ट्रपती भवनात आगमन.
  • 6.18 - मोेदींच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
  • 6.15 - महाराष्ट्रातून ७ जणांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित
  • 6.05 - जगभरातील अनेक दिग्गजांची राष्ट्रपती भवनात हजेरी.
  • 6.00 - राष्ट्रपती भवनात अमित शाहंचे आगमन.
  • 5.45 - राष्ट्रपती भवनात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाल सुरुवात.
  • 5.25 - मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक पार पडली. मोदींनी संभाव्य मंत्र्यांना दिला कानमंत्र.

महाराष्ट्रातून ७ मंत्र्यांनी घेतली शपथ

नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी शपथ घेतली.

Last Updated : May 30, 2019, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details