महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमधून एकही खासदार नाही; तरीही मोदींनी मानले जनतेचे आभार - १३० कोटी

आम्हांला जिंकवतात तेही आमचेच आहेत आणि आम्हांला जिंकवताना जे चुकले तेही आमचेच आहेत, मी सर्वांचे धन्यवाद मानतो, असे आभार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jun 8, 2019, 4:35 PM IST

तिरुवनंतपुरम- लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवलेल्या भाजपला केरळमधूनही एकही जागा जिंकता आलेली नाही. पंरतु, असे असूनसुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळवासीयांचे आभार मानले आहेत. मोदींनी केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी गुरुवायूर येथे जनतेशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या जनतेशी संवाद साधताना

केरळमध्ये भाजपचे खातेही उघडले नाही, असा विचार अनेक राजकीय पंडित करतात. मात्र, अशांना मी सांगू इच्छितो, की जेवढा मी वाराणसीसाठी आहे तेवढाच मी केरळवासीयांसाठी आहे. आम्हांला जिंकवतात तेही आमचेच आहेत आणि आम्हांला जिंकवताना जे चुकले तेही आमचेच आहेत, मी सर्वांचे धन्यवाद मानतो, असे आभार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून मानले.

कार्यकर्त्यांना उद्देशून मोदी म्हणाले, जनता-जनार्दन देवाचे रुप आहे. हे आपण या निवडणुकीत बघितले आहे. परंतु, काही राजकीय पक्ष जनतेला ओळखण्यात चुकले आहेत. जनतेने भाजप आणि एनडीएला प्रचंड जनादेश दिला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर विशेष जबाबदारी असते. ही जबाबदारी १३० कोटी देशवासीयांची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details