नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमुखाने निवड करण्यात आली. यानंतर, मोदी भाषण करताना म्हटले, की नरेंद्र मोदींनी स्वत:ला आव्हान केले होते. ते आव्हान स्वीकारले आणि २०१९ साली झालेल्या निवडणुकीत २०१४ सालचे सर्व रेकॉर्ड मोडले.
नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले, आज सेंट्रल हॉलची ही ऐतिहासिक घटना आहे. मी संविधानाला प्रणाम करतो आणि सर्व देशवासियांचे आभार मानतो. देशात प्रचंड मोठा राजकीय बदल झाला आहे. मी नव्या भारताच्या संकल्पनेला सुरुवात करत आहे. मी तुमच्यातीलच एक असून आपल्याला खांद्याला खांदा लावून चालायचे आहे. २०१४ ते २०१९ जनतेने सरकार चालवले आहे. जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. देशाची लोकशाही परिपक्व होत आहे. प्रचंड जनादेश मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. लोक मला म्हणतात की मत मागण्यासाठी दौरे केले. परंतु, मी मत मागण्यासाठी दौरे केले नाहीत. २०१९ ची निवडणुकीत केलेले दौरे तीर्थयात्रेसमान होते. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार झाल्या आहेत. या निवडणुकीत मातृशक्तीने देशाचे भविष्य ठरवले आहे.
अमेरिकेतल्या निवडणुकींशी तुलना करताना मोदी म्हणाले, जगातील नेत्यांना तर आश्चर्यच वाटते. जेवढी मते ट्रम्पला मिळाली आहेत. तेवढी तर एनडीएच्या मतात वाढ झाली आहे. जागतिकदृष्टीने बघितले तर मोदींच्या ताकदीत वाढ झाली आहे. सबका साथ सबका विश्वास जगाने मान्य केला आहे. मला जागतिक नेते सबका साथ सबका विकासाचा अर्थ विचारतात.