महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंतरराष्ट्रीय योग दिन : पंतप्रधान मोदींनी रांचीत केली योगसाधना - world-yoga-day

भारताचा ठेवा असलेला हा योग मला शहरांपासून खेड्यांकडे घेऊन जायचा आहे. गरीब, आदीवासींपर्यंत तो पोहोचला पाहिजे. कारण गरिबांनाच आजापरणाचा जास्त त्रास होते, असे मोदी यावेळी म्हणाले.

आंतराष्ट्रीय योग दिन

By

Published : Jun 21, 2019, 7:49 AM IST

Updated : Jun 21, 2019, 9:01 AM IST

रांची - पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडची राजधानी रांची येथे योग कार्यकमात हजेरी लावली. आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ४० हजार जणांसोबत योगासने केली.

योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी रांचीतील योगाभ्यास कार्यक्रमात आज (शुक्रवार) हजेरी लावली. यावेळी मोदींनी उपस्थीत नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भाषणांनतर मोदी यांनी विविध योगासने केली. तब्बल ४५ मिनिटांचा हा योगाभ्यास आयोजीत करण्यात आला आहे. योग हा व्यक्तीला सुख, शांती, स्वास्थ आणि समृद्धी मिळवून देतो असे मोदी यावेळी म्हणाले. बदलत्या काळात आजारपणापासून दूर राहत उत्तम आरोग्यावर आपले लक्ष असले पाहिजे. ही शक्ती आपल्याला योगाभ्यासापासून मिळते. हीच योगाची आणि भारतीय संस्कृतीची पवित्र भावना आहे. भारताचा ठेवा असलेला हा योग मला शहरांपासून खेड्यांकडे घेऊन जायचा आहे. गरिब, आदीवासींपर्यंत तो पोहोचला पाहिजे. कारण गरीबांनाच आजापरणाचा जास्त त्रास होते, असे मोदी यावेळी म्हणाले.

काल (गुरुवार) रात्री पंतप्रधान रांची मुक्कामाला होते. यावेळी ४० हजार जणांनी मोदी यांच्यासोबत योगासने केली.

Last Updated : Jun 21, 2019, 9:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details