महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत; म्हणाले, जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी अनोखा ठरला - worship

मोदींनी १९ मे रोजी मतदानाआधी एक व्हिडिओ संदेश जारी करून आपण 'काशीवासी' असल्याचे सांगितले आहे. तसेच, ही नगरी आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

नरेंद्र मोदी

By

Published : May 27, 2019, 10:07 AM IST

Updated : May 27, 2019, 4:42 PM IST

Live Updates :

  • जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी अनोखा ठरला आहे.
  • देशाचा प्रत्येक नागरिक या देशाचा मालक आहे. यात सरकारी काहीच नाही.
  • संसदेचा वापर चर्चेसाठी झाला पाहिजे.
  • आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. जिथे-जिथे संधी मिळाली, तेथे आम्ही काम करून दाखवले आहे. विरोधी पक्षांवर जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांचे संख्याबळ कमी आहे. तरीही आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. विरोधी पक्षात केवळ एक व्यक्ती असली, तरी तिचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.
  • आमच्या अनेक कार्यकर्त्यांची केवळ वेगळी राजकीय विचारधारा आहे, एवढ्या कारणासाठी हत्या होत आहे. देशात राजकीय अस्पृश्यता वाढत चालली आहे. अने क ठिकाणी भाजपचे नाव घेताच अस्पृश्यतेचे वातावरण निर्माण होत आहे.
  • भाजप मतांचे राजकारण करत नाही - मोदी
  • देशाच्या प्रगतीसाठी मेहनत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
  • कार्य आणि कार्यकर्त्यांनी यश खेचून आणले असे म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप दिली. मी नेहमी एक कार्यकर्ताच राहीन, असे ते म्हणाले.
  • सरकार नीतीवर तर संघटना रणनीतीवर चालते. सरकार आणि संघटनेत ताळमेळ आवश्यक - नरेंद्र मोदी
  • मोदींनी वाराणसीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. पारदर्शकता आणि परिश्रम हे विजयाचे गुपित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात विविध धार्मिक उपचारांसह पूजन केले.
  • नरेंद्र मोदींचे वाराणसीत आगमन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले स्वागत. आता मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पूजन करणार आहेत.
  • नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीत जय्यत तयारी

वाराणसी - नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल ते वाराणसीच्या लोकांचे आभार मानतील. या दौऱ्यात मोदी प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात पूजनही करतील. त्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या सभेलाही संबोधित करतील. मोदींनी वाराणसीत ४.७९ लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला.

वाराणसी पोहोचल्यानंतर मोदी पोलीस लाईनपासून बांसफाटकला जातील. शहरातील विविध भागांमध्ये त्यांचा ताफा फिरणार आहे. यासाठी आज संपूर्ण वाराणसीला सजवण्यात आले आहे. विजय मिळाल्यानंतर मोदींचा पहिला दौरा आहे. त्यांनी २०१४ मध्ये मिळवलेल्या मताधिक्याहून या वेळचे मताधिक्य साधारण १ लाखाने अधिक आहे.

मोदींनी १९ मे रोजी मतदानाआधी एक व्हिडिओ संदेश जारी करून आपण 'काशीवासी' असल्याचे सांगितले आहे. तसेच, ही नगरी आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेचा मोठा बंदोबस्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी या भागांवर लक्ष ठेवून आहेत.

Last Updated : May 27, 2019, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details