महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी पंतप्रधान देवेगौडा यांची 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट; मोदींनी व्यक्त केला आनंद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि्वट

माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा असलेल्या पर्यटन स्थळी भेट दिली.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिली 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला भेट, मोदींनी व्यक्त केला आनंद

By

Published : Oct 6, 2019, 6:54 PM IST

नवी दिल्ली -माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा असलेल्या पर्यटन स्थळी भेट दिली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

खुपच आनंदाची बाब आहे की, माजी पंतप्रधान देवेगौडा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी गेले आहेत, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिली 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला भेट, मोदींनी व्यक्त केला आनंद
स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला भेट दिल्यानंतर देवेगौडा यांनी छायाचित्र टि्वट केले होते. आज स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिली 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला भेट

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता.


'स्टॅच्यू ऑफ युनिटी' नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा दुप्पट उंच आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे. सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details