महाराष्ट्र

maharashtra

भारताच्या अभिजित बॅनर्जींना अर्थशास्त्राचे 'नोबेल', पंतप्रधान मोदींसह इतर मान्यवरांनी केले अभिनंदन

By

Published : Oct 14, 2019, 8:34 PM IST

भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली -भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर मान्यवरांनी अभिजित यांचे अभिनंदन केले आहे.


यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजीत यांचे अभिनंदन, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांचे ही अभिनंदन केले आहे.

राहुल गांधी यांनी टि्वट करून अभिजीत यांचे अभिनंदन केले आहे.

अभिजित बॅनर्जी यांच्या आईने आनंद व्यक्त केला आहे. हा क्षण पुर्ण परिवारासाठी खास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टि्वट करून अभिजीत यांचे अभिनंदन केले आहे. अजून एका बंगालीने देशाला सन्मान मिळवून दिला, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी टि्वट करून अभिजीत यांचे अभिनंदन केले

अरविंद केजरीवाल यांचे टि्वट.

अरविंद केजरीवाल यांनी केले अभिजीत यांचे अभिनंदन

अशोक मालिक यांनी अभिजीत यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांचे कौतूक केले आहे.

अशोक मालिक यांनी अभिजीत यांना शुभेच्छा दिल्या.

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना मिळाला आहे.हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details