महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'विशाखापट्टनम वायू गळती घटनेची वैज्ञानिकरित्या चौकशी करावी' - आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन.चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशाखापट्टनम गॅस गळतीच्या घटनेची वैज्ञानिकरित्या चौकशी करण्याची विनंती केली आहे.

Naidu writes to PM
Naidu writes to PM

By

Published : May 9, 2020, 11:44 AM IST

विशाखापट्टनम - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशाखापट्टनम गॅस गळतीच्या घटनेची वैज्ञानिकरित्या चौकशी करण्याची विनंती केली आहे. विषारी वायू गळतीमागील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी वैज्ञानिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कंपनीमधून स्टायरिन वायूची गळती झाली. मात्र, इतर विषारी वायू तेथे असल्याची विरोधाभासी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वायुचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून घेण्यासाठी त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे नायडू यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच विशाखापट्टनम शहरातील हवेच्या गुणवत्तेचे अगदी जवळून परीक्षण केले जाण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह ११ जणांचा यात मृत्यू झाला आहे. या विषारी वायूचा प्रादुर्भाव जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details