नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपुरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत (एमएसएमई) चांगल्या प्रतीची आणि परवडणारे पीपीई किट तयार करण्यात आले आहे. त्यांनी ट्विटरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली. चीनवरून आलेले किट हे निकृष्ट दर्जाचे होते, आणि म्हणूनच चांगल्या गुणवत्तेच्या आणि स्वस्त अशा किट्सची निर्मीती करण्याची गरज समोर भासली, असे ते म्हणाले.
नागपूरच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाद्वारे स्वस्त वैद्यकीय उपकरणं, साहित्याची निर्मिती, नितीन गडकरींची माहिती - Ministry of Micro, Small and Medium Enterprises
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट्सची टंचाई दूर करण्यासाठी नागपूरच्या एमएसएमई मंत्रालयाने उत्तम प्रतीची आणि कमी किमतीची पीपीई किट बाजारात आणण्याची तयारी केली आहे. या किट्सची किंमत ही ५०० ते ६०० रुपयांपर्यंत असून ती बाजारात १ हजार ५०० ते १ हजार ६०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या इतर किट्सच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
![नागपूरच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाद्वारे स्वस्त वैद्यकीय उपकरणं, साहित्याची निर्मिती, नितीन गडकरींची माहिती नितीन गडकरी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7063208-379-7063208-1588644779533.jpg)
बाजारात उबलब्ध असलेल्या किट्सची किंमत साधारणत: १ हजार ५०० ते १ हजार ६०० रुपयापर्यंत आहे. डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल फोर्स, स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांद्वारे त्यांचा वापर केला जात आहे. मात्र, आम्ही तयार केलेल्या पीपीई किट या बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या पीपीई किट्सच्या तुलनेत परवडणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.
यामध्ये ५०० ते ६०० रुपयांपासून मिळणाऱ्या तीन प्रकारच्या किट उपलब्ध करण्यात आल्या असून त्या बाजारापेठेत मिळणाऱ्या इतर किट्सच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहेत. तसेच, आम्ही दर दिवसाला अशा १० हजार किटची निर्मीती करू शकतो असेही गडकरी यांनी सांगितले. लवकरच आम्ही तयार केलेल्या किट या इतर सर्व राज्यात पाठवल्या जातील असेही गडकरी यावेळी म्हणाले.