चेन्नई - भारतीय पत्र परिषदेने (प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया) काश्मीरमधील माध्यमांवरील बंदीचे समर्थन करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याबाबत बोलताना, हे अतिशय लज्जास्पद आहे असे मत 'द हिंदू' वृत्तपत्राचे एन. राम यांनी व्यक्त केले आहे.
काश्मीरमधील माध्यमबंदीच्या याचिकेवरून एन. राम यांची पीसीआयवर टीका - काश्मीरमधील माध्यमांवरील बंदी
चेन्नईमधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, एन. राम यांनी भारतीय पत्र परिषदेवर टीका केली. परिषदेच्या अध्यक्षांनी जे करणे अपेक्षित होते, त्याच्या अगदी उलटी भूमिका घेतली. हा फक्त माध्यमांच्या स्वातंत्र्याचा नाही, तर व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील मुद्दा आहे. या घटनेची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, हे अतिशय लज्जास्पद आणि भयानक आहे.
प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया
चेन्नईमधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, एन. राम यांनी भारतीय पत्र परिषदेवर टीका केली. परिषदेच्या अध्यक्षांनी जे करणे अपेक्षित होते, त्याच्या अगदी उलटी भूमिका घेतली. हा फक्त माध्यमांच्या स्वातंत्र्याचा नाही, तर व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील मुद्दा आहे. या घटनेची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे अतिशय लज्जास्पद आणि भयानक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.