महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशातील मुस्लिमांनी कॉंग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये' - Shahnawaz Hussein in goa

काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते देशातील लोकांची दिशाभूल करत आहेत. सध्या देशात काँग्रेसमुळे आंदोलने होत आहेत. जगात धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी भारत हाच सर्वात सुरक्षित देश आहे. नव्या नागरिकत्व कायद्याचा भारतातील अल्पसंख्यांकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी प्रतिक्रीया भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी दिली आहे.

hussein
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

By

Published : Dec 19, 2019, 11:53 AM IST

पणजी -नागरिकत्व सुधारणा कायदा हा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे धार्मिक अल्पसंख्याक भारताचे नागरिकत्व घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आहे. फाळणीला विरोध करून भारतात राहिलेल्या मुस्लिमांना कोणीही देशाबाहेर काढणार नाही. त्यामुळे, मुस्लिमांनी काँग्रेसच्या भुलथापांना बळी पडू नये. ते देशातील नागरिकांची दिशाभूल करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी दिली आहे. आज(19 डिसेंबर) भाजपच्या पणजीतील गोवा प्रदेश मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

हुसेन म्हणाले, "काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते देशातील लोकांची दिशाभूल करत आहेत. सध्या देशात काँग्रेसमुळे आंदोलने होत आहेत. जगात धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी भारत हाच सर्वात सुरक्षित देश आहे. नव्या नागरिकत्व कायद्याचा भारतातील अल्पसंख्यांकांना कोणताही त्रास होणार नाही" गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना या कायद्यामुळे कुठलीही अडचण येणार नसल्याचेही हुसेन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्याविषयी बोलताना हुसेन म्हणाले, "देशात कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव नाही. 20 कोटी मुस्लीम आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 600 मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. हे करत असताना पूर्वीचे कायदे रद्द केलेले नाहीत. हा केंद्राचा कायदा आहे. त्यामुळे तो सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा -गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आसाममध्ये लागू करण्यात आलेला एनआरसी कायदा हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि ऑल आसाम स्टुडंट युनियन यांच्यामधील कराराचा परिणाम असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो राबविण्यात आला आहे, असा आरोपही हुसेन यांनी केला आहे. यावेळी, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद तानवडे, वीजमंत्री नीलेश काब्राल आणि भाजप हज यात्रा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष शेख जीना आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details