भोपाळ - मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केल्याप्रकरणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लीम देशांतून आंदोलन होत आहे. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रानप्रती मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये मुस्लीम समाजाने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस खासदार अरिफ मसूद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढण्यात आले आहे. एमॅन्युएल मॅक्रान यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
भारत सरकारने फ्रान्स सरकारशी असलेले संबंध तोडावे, अशी मागणी काँग्रेस खासदार अरिफ मसूद यांनी केली. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांनी भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सशी असलेले संबंध तोडावे आणि आयात-निर्यात बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.