महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुस्लिम युवकाने स्वत:च्या रक्ताने लिहिले 'जय श्रीराम', जाणून घ्या कारण - फरहतअली खान

रक्ताने जय श्रीराम लिहिणारे फरहतअली खान म्हणाले, आज आम्ही जय श्रीराम हे धार्मिक नाव आमच्या रक्ताने लिहिले आहे. हिंदुस्तानातील मुसलमान इस्लामची ज्याप्रमाणे कदर करतो त्याप्रमाणे श्रीरामवरतीही प्रेम करतो.

मुस्लिम युवकाने स्वत:च्या रक्ताने लिहिले 'जय श्रीराम'

By

Published : Jun 28, 2019, 7:31 PM IST

रामपूर- ओम आणि जय श्रीरामच्या उच्चाराला अनेक मुस्लिम संघटनांनी गैर-इस्लामिक घोषित केले आहे. परंतु, मुस्लिम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष फरहतअली खान यांनी स्वत:च्या रक्ताने जय श्रीराम लिहिलेले पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे.

रक्ताने जय श्रीराम लिहिणारे फरहतअली खान म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये हिटरलशाहीसारखे वातावरण बनवले आहे. राज्यात धार्मिक नाऱ्यांचा उच्चार केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात येत आहे. यासोबतच विनाकारण जनतेला तुरुंगात टाकण्यात येत आहे. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे गरजेचे आहे. ममतांनी राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण केली आहे. राज्यातील नागरिकांचा स्वतंत्रेचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. भारत अनेक परंपरा आणि धार्मिक मान्यतेचा देश आहे. त्यामुळे येथे प्रत्येक धर्माच्या लोकांना धार्मिक घोषणा देण्याचा आणि उत्सव साजरे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

आज आम्ही जय श्रीराम हे धार्मिक नाव आमच्या रक्ताने लिहिले आहे. हिंदुस्तानातील मुसलमान इस्लामची ज्याप्रमाणे कदर करतो त्याप्रमाणे श्रीरामवरतीही प्रेम करतो. आमच्यासाठी रेहमानप्रमाणेच श्रीराम आहेत, असेही फरहतअली खान म्हणाले. यावेळी फरहतअली खान यांनी रामपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. खान यांनी राष्ट्रपतींना देण्यासाठी रक्ताने लिहिलेले जय श्रीरामचे पत्र जिल्हाधिकांना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details