अयोध्या -संपूर्ण अयोध्या शहर राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सज्ज झाले असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते चांदीची वीट रचून पाया भरण्यात येणार आहे. अयोध्येत या दिनी दिपोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. भूमीपूजनाच्या दिवशी हिंदू मुस्लिम ऐकोप्याचा संदेश एक मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार आहे. पूर्वापार चालत आलेल्या गंगा-जमुनी-तेहझीब या परंपरेचे पालन हे मुस्लिम कुटुंब करणार आहे.
गंगा-जमुनी-तेहझीब ही पुर्वापार चालत आलेली हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या एकोप्याचा संदेश देणारी संस्कृती आहे. दोन्ही धर्मांची वैशिष्ट्ये एकमेकांत असून प्रेमानेे दोन्ही धर्मांनी एकत्र राहण्याचा संदेश यातून देण्यात येतो. बाबुल खान यांच्या कुटुंबियांकडून या परंपरेचे पालन करण्यात येत आहे. बाबुल खान यांनी राम मंदिर अभियानालाही पाठिंबा दिला होता. आता 5 ऑगस्टला दिपोत्सव साजरा करण्याची त्यांची तयारी सुरु आहे.