महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श.. मुस्लीम कुटूंबाकडून मागील २१ वर्षापासून दिवाळीला आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन - मुस्लीम कुटुंबाची आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन

अलिगड शहरात राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन करून दिवाळी साजरी करत हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श नमुना सादर केला. हे मुस्लीम कुटूंब मागील २१ वर्षापासून दिवाळीदिवशी घरात लक्ष्मी व गणेश पूजन करत आहे.

Muslim family performed Lakshmi poojan
मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन

By

Published : Nov 15, 2020, 7:11 PM IST

अलिगड - उत्तर प्रदेशमधील अलिगड शहरात राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन करून दिवाळी साजरी करत हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श नमुना सादर केला. दिल्ली गेट परिसरातील एडीए कॉलनीमध्ये हे मुस्लीम कुटूंब राहते.

राज्यात एकीकडे हिंदू-मुस्लिम वादावरून राजकारण केले जाते. त्याचवेळी अलीगडमध्ये काही मुस्लिम महिलांनी दिवाळीला घरात लक्ष्मी व गणेश पूजन करून धार्मिक सहिष्णुतेचे उदाहरण सादर केले आहे. एडीए कॉलनीत राहणाऱ्या रूबी आसिफ खान यांनी आपल्या घरात लक्ष्मी गणेश- पूजेचे आयोजन केले व घरात दिवे लागून दिवाळीही साजरी केली. यावेळी अन्य मुस्लीम महिलाही सामील झाल्या होत्या.

रूबी खान यांनी सांगितले, की मागील २१ वर्षापासून त्या दिवाळीदिवशी घरात लक्ष्मी व गणेश पूजन करत आली आहे. पहिल्या वर्षी एक दिवा लावला व दुसऱ्या वर्षी दोन. आता २१ व्या वर्षी २१ दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे.

रूबी आसिफ खान भाजपच्या महिला मोर्चाची महावीरगंज मंडळ मंत्री आहोत. त्या दिवाळीसोबतच हिंदू रीति-रिवाजाप्रमाणे अनेक सण व उत्सव साजरे करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details