इंदौर- शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे स्टेडिअम भागात असलेले महानगरपालिकेचे कार्यालयाला चक्क तळ्याचे स्वरुप आले. त्यामुळे, रविवारी कर्मचारी आणि नागरिकांना जवळपास २ तास अशा स्थितीतच काम करावे लागले.
जोरदार पावसानंतर इंदौर महानगरपालिकेला तळ्याचे स्वरुप, कर्मचाऱ्यांनी पाण्यात बसून केले काम
रविवारी कर भरणीसाठी महानगरपालिकेतील महसूल कार्यालय सुरू होते. करभरणीसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, जोरदार झालेल्या पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या.
इंदौर महानगरपालिका कार्यालय
महानगरपालिकेतील सहाय्यक महसूल अधिकारी सी. बी. सिंग म्हणाले, रविवारी कर भरणीसाठी महानगरपालिकेतील महसूल कार्यालय सुरू होते. करभरणीसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, जोरदार झालेल्या पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाणी शिरल्यामुळे दुपारी ३ ते ५ या कालावधीत कामकाज जवळपास बंदच झाले होते. तर, महानगरपालिका अधिकारी रितेश म्हणाले, कार्यालयात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. परंतु, सर्व पाणी आता बाहेर काढण्यात आले आहे.
Last Updated : Jul 1, 2019, 7:05 PM IST