मुंबई - अनेक वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्यांचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईच्या ग्रँट रोड परिसर आता पूर्णपणे वेगळा पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी पूर्वी वेश्याव्यवसाय सुरू असायचा, तेच ठिकाण आता मुस्लीम धर्मियांचे प्रार्थनास्थळ बनले आहे. स्थानिक मुस्लिमांनी एक कुप्रसिद्ध वेश्यालय इमारत विकत घेतल्यानंतर हा बदल झाला आहे. त्यामुळे आता नमाज पठण करताना भक्तांना अडचणी येत नाहीत.
कुप्रसिद्ध इमारतीचे 22 वर्षांच्या प्रयत्नानंतर प्रार्थनास्थळात रुपांतर... - Grant Road Mosque
मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील एक कुप्रसिद्ध वेश्यालय इमारत स्थानिक मुस्लिमांनी विकत घेतली. तब्बल 22 वर्षांच्या प्रयत्नानंतर एका भक्ताने ती इमारत खरेदी केली आणि त्याचे रुपांतर मशिदीमध्ये केले.
ग्रँट रोडवरील एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालायचा. त्या इमरातीच्या शेजारी मुस्लीम धर्मियांचे प्रार्थनास्थळ असलेली एक लहानशी मशीद होती. ही मशीद ग्रँट रोड रेल्वेस्थानकाच्या अगदी समोर आहे. मशीद लहान असल्याने त्यामध्ये काही जणांना प्रार्थना करण्याची सोय होती. त्यामुळे अनेक भक्तांना मशिदीबाहेर बसून प्रार्थना करावी लागे. मात्र, शेजारी असलेल्या वेश्यालय इमारतीमुळे प्रार्थना करण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
या अडचणी लक्षात घेत, तब्बल 22 वर्षांच्या प्रयत्नानंतर एका भक्ताने ती इमारत खरेदी केली आणि त्याचे रुपांतर पार्थनास्थळ मशिदीमध्ये केले. आता ती कुप्रसिद्ध जागा ग्रँट रोड मशीद म्हणून ओळखली जात आहे. या ठिकाणी आता मुस्लिम धर्मिय मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यासाठी जमत आहेत. या कामी मशिदीच्या ट्रस्टींची मोलाची मदत झाली असल्याचे मशिद व्यवस्थापक अस्लम खालची यांनी सांगितले.