नवी दिल्ली -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. येत्या 3 मे रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व जिलह्याचे वर्गिकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन असे केले आहे. यात 130 रेड झोन, 284 ऑरेंज झोन आणि 319 ग्रीन झोन आहेत. महत्वाचे म्हणजे देशातील प्रमुख चार महानगरे म्हणजेच मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.
देशातील या चार मुख्य शहरांप्रमाणेच बंगळूर शहर, बंगळूरू ग्रामीण, लखनौ, हैदराबाद, इंदुर, भोपाळl, पटना, अहमदाबाद, सुरत, पुणे आणि नागपूर या महत्वाच्या शहरांचा समावेश देखील रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वरील वर्गीकरणाची माहिती दिली आहे.
हेही वाचा...हैदराबादमध्ये अडकलेले हरियाणाचे १,२०० कामगार विशेष रेल्वेने घरी रवाना..