लखनऊ -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना काल(शुक्रवार) प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. लखनऊमधील मेधांता रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती स्थिर - मुलायम सिंह यादव बातमी
मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी मूत्र मार्गात संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली, मात्र, चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयाचे संचालक राकेश कपूर यांनी सांगितले, मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी मूत्र मार्गात संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली, मात्र, चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची सोनोग्राफी, रक्त आणि लघवी तपासणी करण्यात आल्याचेही कपूर यांनी सांगितले.
पक्षाध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस कऱण्यासाठी शुक्रवारी रात्री रुग्णालयात गेले होते, असे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चक्रवर्ती यांनी सांगितले.