महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची रविवारी तब्येत खालवल्याने त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Mulayam Singh Yadav Fine Now Discharged From Hospital
Mulayam Singh Yadav Fine Now Discharged From Hospital

By

Published : May 11, 2020, 2:27 PM IST

नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची रविवारी तब्येत खालवल्याने त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून त्यांना पोटाची समस्या उद्भवली होती.

शनिवारी डिस्चार्ज दिल्याच्या 24 तासांच्या आत मुलायम सिंह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य होते. शनिवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, रविवारी संध्याकाळी त्यांची तब्येत पुन्हा खालावली.

ABOUT THE AUTHOR

...view details