गुरगाव - समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यांना लखनौमधील मेदांता रुग्णालयातून हलविण्यात आले आहे. त्यांना गुरगावच्या खासगी रुग्णालयात सोमवारी उशीरा दाखल करण्यात आल्याची माहिती समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याने दिली.
मुलायम सिंह लखनौमधून गुरगावच्या खासगी रुग्णालयात दाखल - समाजवादी पक्ष
मुलायम सिंह यांच्या तब्यतेविषयी मेदांता रुग्णालयाकडून अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
मुलायम सिंह
७९ वर्षीय मुलायम यांची रक्तामधील साखर वाढल्याचे रविवारी दिसून आले. त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया इनस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या तब्यतेविषयी मेदांता रुग्णालयाकडून अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यादव यांच्या घरी जावून त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली होती.
Last Updated : Jun 11, 2019, 3:47 AM IST