महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 25, 2019, 6:13 PM IST

ETV Bharat / bharat

मोदी सरकार एकदा घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करत नाही - मुख्तार अब्बास नक्वी

'मोदी सरकार एकदा घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करत नाही. कलम 370 परत लागू होणार नाही', असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर अनेक नेते या निर्णयावर सरकारला पुनर्विचार करण्याचा सल्ला देत आहेत. यावर 'मोदी सरकार एकदा घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करत नाही. कलम 370 परत लागू होणार नाही', असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.


सरकाराचा हा निर्णय सामान्य नागरिकांना भडकवणाऱ्या त्या विद्रोही लोकांसाठी आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कलम 370 राज्यातून हटवण्यात आले आहे. आता ते परत कधीच लागू होणार नाही. हे कलम हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने पुर्ण विचार करून घेतला आहे. मोदी सरकार एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर पुनर्विचार करत नाही, असे मुख्तार म्हणाले.


जम्मू काश्मीरला कलम 370 नेच काहीच दिले नाही. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा लोक राजकीय पुर्वग्रहामधून विरोध करत आहेत. मात्र जी लोक काश्मीरची समस्या समजतात. ती राजकीय पुर्वग्रहाच्यावर विचार करून या निर्णयाचे समर्थन करत आहेत. कलम 370 हटवून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अद्याप राज्यात एकदाही गोळीबार झाला नाही. जर लोकांचा विरोध असता तर कर्फ्यू असतानाही लोकं रस्त्यावर उतरली असती. मात्र असे झाले नाही कारण, कलम 370 चा काहीच फायदा झाला नाही, हे लोकांना माहिती आहे, असेही नक्वी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details