महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात, डॉक्टरांची माहिती

प्रणव मुखर्जी यांना श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला.

Pranab Mukherjee  Army hospital  pranab mukherjee health condition  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तब्येत  pranab mukharjee health update
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

By

Published : Aug 28, 2020, 1:37 PM IST

Updated : Aug 28, 2020, 2:31 PM IST

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सध्या डीप कोमामध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

प्रणव मुखर्जी यांना श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच ते कोमात गेले. सध्या ते व्हेंटिलेटरवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांचे एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Last Updated : Aug 28, 2020, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details