महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'येत्या काही वर्षात भारताचा वेगाने अर्थिक विकास होईल' - पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ

पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठातील कार्यक्रमाला आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी संबोधीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या सुधारणामुळे येत्या काही वर्षांत भारत आर्थिक भरारी घेईल, असे ते म्हणाले. येत्या काळात भारताचा आणखी विकास होईल आणि भारत पहिल्या मोठ्या तीन जागतीक अर्थव्यवस्थापैकी एक असेल, असेही ते म्हणाले.

मोदी-मुकेश
मोदी-मुकेश

By

Published : Nov 21, 2020, 5:36 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठात आज मोनोक्रिस्टलाइन सौर फोटो व्होल्टाइक पॅनेलच्या 45 मेगावॅट वीजनिर्मिती केंद्राचे उद्घाटन केले. तसेच पंतप्रधानांनी विद्यापीठातील क्रीडा संकुलाचे उद्घाटनही केले. यावेळी आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी कार्यक्रमाला संबोधीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या सुधारणामुळे येत्या काही वर्षांत भारत आर्थिक भरारी घेईल. पंतप्रधान मोदींच्या दृढ आणि प्रभावी नेतृत्त्वामुळे संपूर्ण जगाला भारताकडे पाहण्याचा एका नवा दृष्टीकोन मिळाला आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय संपूर्ण देशाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले.

आपल्या सर्वांना माहित आहे, की पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ हे आदरणीय पंतप्रधानांच्या स्वावलंबी दृष्टीकोनाचे प्रतिक आहे. तसेच अयशस्वी न होता, हवामान बदलांची जबाबदारीदेखील पूर्ण करण्याचे आपले कर्तव्य आहे. उर्जी भविष्य अभूतपूर्व बदलांसह आकार घेत आहे. हे बदल मानवतेच्या भवितव्यावर परिणाम करीत आहेत. पर्यावरणाचे नुकसान न करता आपण आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी उर्जा तयार करु शकतो का, हा प्रश्न आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले.

कोरोबाबत सावधानता -

भारत कोरोनाविरोधात लढा देत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट आपल्या महागात पडू शकते. भारताने यापूर्वीही अनेक संकटाचा सामना केला आहे. संकटातून उभारी घेत, भारत पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाला आहे. येत्या काळात भारताचा आणखी विकास होईल आणि भारत पहिल्या मोठ्या तीन जागतीक अर्थव्यवस्थापैकी एक असेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -कोल्हापूरचा आणखी एक सुपुत्र हुतात्मा; निगवे-खालसाच्या संग्राम पाटील यांना सीमेवर वीरमरण

ABOUT THE AUTHOR

...view details